Home अहमदनगर नगरची जागा राष्ट्रवादीच लढणार, रोहित पवार, सुप्रिया सुळे?

नगरची जागा राष्ट्रवादीच लढणार, रोहित पवार, सुप्रिया सुळे?

Breaking News | Ahmednagar:  मध्यंतरी आ. रोहित पवार, खा. सुप्रिया सुळे यांची नावेही चर्चेत आघाडीवर होते.

Loksabha Election NCP will fight for Nagar seat, Rohit Pawar, Supriya Sule

Loksabha Election Candidate: सध्या लोकसभेला दक्षिणसाठी कोण उमेदवार हवा किंवा असेल याबाबत विविध चर्चा राष्ट्रवादीच्या घडत आहेत. यासाठी विविध नावे समोर येत आहेत. मध्यंतरी आ. रोहित पवार, खा. सुप्रिया सुळे यांची नावेही चर्चेत आघाडीवर होते. तसेच ही जागा घेण्यासाठी काँग्रेसही आग्रही होते. आता नगरची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचे आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले.

तसेच या जागेवर उमेदवार देखील जिल्ह्यातीलच असेल बाहेरचा उमेदवार आणण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या तरी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा नाही हे स्पष्ट झाले आहे. तीन व चार जानेवारीला शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांना हात घातला.

सध्याचे सरकार केवळ घोषणा करणारे आणि जाहिरात करणारे सरकार आहे, वास्तविक शेतकऱ्यांना जी मदत व्हायला हवी ती होताना दिसत नाही. याबाबत मी विधानसभा आणि बाहेर देखील बोलतो, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री, लोकप्रतिनिधी गेले मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत झाली नाही, याबाबत तनपुरे यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले आहे.

Web Title: Loksabha Election NCP will fight for Nagar seat, Rohit Pawar, Supriya Sule

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here