Home पुणे पुण्यातील रास्ता पेठेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग

पुण्यातील रास्ता पेठेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग

Pune News: विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत (Fire) तेथील साहित्य जळून खाक.

fire broke out in a student hostel in Pune's Rasta Pethe

पुणे :रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला शुक्रवारी (दि. ३) सकाळी लागलेल्या आगीत तेथील साहित्य जळून खाक झाले. मुलींच्या व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली.

आगीची वर्दी मिळाल्यावर अग्निशामक दलाच्या मुख्यालयातील व कसबा केंद्रातील पथके अग्निशमन बंबांसह घटनास्थळी दाखल झाली. या वसतिगृहातील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमधून धूर येत असल्याचे सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आले. तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधला. तेथे पोहोचलेल्या पथकाने सर्व विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची खात्री केली. या खोलीतील तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. त्यानंतर संपूर्ण इमारतीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्ण जळाल्या. खोलीमधील हिटरमुळे हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

अग्निशामक दलाकडून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, विविध मॉल, इमारतीमध्ये आग लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचा उपयोग करून वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक स्वरूपात वापरलेली अग्निरोधक उपकरणे आग विझवण्यात महत्त्वपूर्ण ठरली.

Web Title: fire broke out in a student hostel in Pune’s Rasta Pethe

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here