Home अहमदनगर बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात नगर मधील मुख्याध्यापकासह पाच जण ताब्यात

बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात नगर मधील मुख्याध्यापकासह पाच जण ताब्यात

Ahmednagar News: बारावी गणित पेपर फुटी प्रकरण राज्यभर गाजले आहे. मुंबई गुन्हे शाखा पथकाने एका मुख्याध्यापकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Five people, including the headmaster of Arrested in the case of 12th paper leak

अहमदनगर:  बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात रूईछत्तीशी (ता. नगर) येथील एका मुख्याध्यापकासह पाच जणांना मुंबईच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मुंबई पोलीस त्यांना तपासकामी घेऊन गेले आहेत.

किरण संदीप दिघे (वय 28 रा. बालिकाश्रम रोड, सावेडी), अर्चना आबासाहेब भामरे (वय 23 रा. रूईछत्तीशी), भाऊसाहेब लोहाजी अमृते (वय 54 रा. वाटेफळ ता. नगर), वैभव संजय तरटे (वय 29 रा. घोगरगाव), सचिन दत्तात्रय महानोर (वय 23 रा. थेरगाव ता. कर्जत) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सर्व पेपरफुटीचे प्रकरण गृह विभागाकडून अतिशय गोपनीय पध्दतीने हाताळले जात आहे. गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील शिक्षकांकडून मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकांसह पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बारावीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबईत दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिथे हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करताना पोलिसांना याचे धागेदोरे नगरच्या रूईछत्तीशी गावात असल्याचे आढळून आले. येथे परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. फोडलेल्या या प्रश्नपत्रिकेची प्रत्येकी 10 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Five people, including the headmaster of Arrested in the case of 12th paper leak

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here