Home Accident News ब्रेकिंग: अॅपे रिक्षा आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार

ब्रेकिंग: अॅपे रिक्षा आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार

Accident:  अॅपे रिक्षा आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना.

people were killed in a horrific accident involving an Appe rickshaw

जालना: अॅपे रिक्षा आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना जालन्यात घडली.  तर या अपघातात तीन जण जखमी झाली आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेली धडक एवढी जोरदार होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

या अपघातात

  1. मनीष बबन तिरुखे (वय 26 वर्ष) देउळगाव राजा जिल्हा बुलढाणा
  2. परवीन बी राजू शहा (वय 25)
  3. आलिया राजू शहा (वय 7)
  4. मुस्कान राजू शहा (वय 3)
  5. कैफ अशपाक शहा (वय 19) सर्व मोळवंडी जिल्हा बुलढाणा

अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

जालन्यातील जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ हा अपघात झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बुलडाणा जिल्ह्यातील मोळवंडी गावातील रहिवासी आहे. अपघात इतका भीषण होता की,अॅपे रिक्षातील 5 जण जागीच ठार झाले. या अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य करत जखमींना जाफराबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तीन जणांवर तेथे उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे.

Web Title: Five people were killed in a horrific accident involving an Appe rickshaw

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here