Home संगमनेर संगमनेर: बर्डे कुटुंबियांना घरकुल मिळावे यासाठी अजित पवारांचा थेट आदिवासी मंत्र्यांना थेट...

संगमनेर: बर्डे कुटुंबियांना घरकुल मिळावे यासाठी अजित पवारांचा थेट आदिवासी मंत्र्यांना थेट फोन

Sangamner Electric Shock Incident: चार सक्ख्या चुलतभावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू. 

Sangamner Electric Shock Incident Ajit Pawar Visit

संगमनेर: घरकुल योजनेंतर्गत बर्डे कुटूंबियांना घरकुल मिळावे यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजय कुमार गावित यांना फोन लावत या कुटुंबियांसाठी दोन घरकुल मंजूर करा अशी मागणी खास आपल्या शैलीत केल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी अंतर्गत असलेल्या वांदरकडा येथील चार सख्या चुलतभावांचा विजेचा जबरधक्का बसून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे त्या बर्डे परिवाराची विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अकलापूर येथेजाऊन बर्डे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या वेळी त्यांच्या समवेत अकोले तालुक्याचे आ डॉ किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर,मनसेचे उपजिल्हाप्रमुख किशोर डोके ,राष्ट्रवादीचे कपिल पवार, आंबे खालसा चे सरपंच बाळासाहेब ढोले यांच्यासह पठार भागातील कार्यकर्ते होते.

आमची मुलं विजेचा धक्का बसून मयत झालेल्या घटनेला नऊ दिवस उलटू नही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली अद्याप मिळाली नसल्याची बाब बर्डे कुटुंबियांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. विरोधी पक्षनेते पवार यांनी बर्डे कुटुं बियांच्या घरकुलासंबंधी गट विकास अधिकार्यांशी चर्चा केली. हे आदिवासी कुटुंब असल्याने त्यांना शबरी योजनेतून घरकुल मंजूर करून द्यावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ विजय कुमार गावित यांच्याकडे केली

राज्य सरकार तुमची काही मदत मिळेल त्या मदतीची पैसे खर्च करू नका तर ती मदत मुदत ठेवीत ठेवा. पैसे पतसं स्थेत ठेऊ नका कारण पतसंस्था बुडतात. त्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा अन्यथा अ नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवा. असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हात जोडून बर्डे कुटुंबियांना दिला.

Web Title: Sangamner Electric Shock Incident Ajit Pawar Visit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here