Home महाराष्ट्र Rape | माजी शिक्षण अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Rape | माजी शिक्षण अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Former education officer charged with rape

नाशिक: पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत सुमारे सहा वर्ष वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत शारीरिक अत्याचार केल्याची घटना गोविंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून धुळ्याच्या एका माजी शिक्षण अधिकाऱ्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहा वर्षापूर्वी पिडीता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काही कामानिमित्त गेल्या असता तेथे संशियीत प्रवीण वसंत अहिरे रा. गोविंदनगर यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अहिरे यांनी पिडीतेला विश्वासात घेऊन लग्न करण्याचे आमिष दाखविले. २०१६ पासून आतापर्यंत पिदीतेबरोबर वारंवार शाररिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अंबड पोलिसांनी संशियीत अहिरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे एकमेकांना सहा वर्षापासून ओळखतात. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस करीत आहे.

Web Title: Former education officer charged with rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here