Home महाराष्ट्र पाच दिवसांवर होतं लग्न, नवऱ्या मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

पाच दिवसांवर होतं लग्न, नवऱ्या मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

marriage took place in five days, the husband's son fell into a well and died unfortunate

जळगाव | Jalgaon: लग्नाला केवळ ५ दिवस बाकी असतांना नियोजित वर मुलाचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू (Died) झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजता घडली. वर मुलाच्या अचानक मृत्यूमुळे परिवारासह मित्रमंडळीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

एरंडोल येथील  महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश संजय महाजन (वय २५) याचा विवाह २५ एप्रिलला नियोजित होणार होता. घरातील मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन व त्यांच्या परिवारात मोठे आनंदाचे वातावरण होते. विवाहाची तयारी जोरात सुरु होती. नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधव यांना लग्न पत्रिका, आमंत्रण देखील देण्यात आले होते.

सकाळी नियोजित वर भावेश संजय महाजन हा काका ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांच्या घरी गेला आणि तुमची मोटरसायकल द्या मी नाश्ता करायला जात आहे; असे सांगून गेला होता. बराच वेळ झाल्यानंतर देखील भावेश मोटरसायकल घेवून आलाच नाही त्यामुळे  ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो अद्याप घरी आला नसल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले. काही वेळानंतर भावेशचे भाऊ राकेश आणि मनोज यांनी ज्ञानेश्वर महाजन यांनी मोबाईल करून भावेश हा धरणगाव रस्त्यावरील त्याच्या शेताच्या जवळ असलेल्या सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर महाजन हे त्यांचे नातेवाईक गजानन माळी यांच्यासह शेतात गेले असता भावेश यास परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढले आणि त्यास ग्रामीण रुग्णालयात  नेले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

Web Title:  marriage took place in five days, the husband’s son fell into a well and died unfortunate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here