सातारा | Satara: सध्या पैसे मिळविण्यासाठी सोशल मीडियावर तरुणांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रकार सुरूच आहे. हनीट्रपमध्ये अडकवून खंडणीची (Hony Trap) प्रकरणे उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज करत तरुण मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या पती-पत्नीचा वाई पोलिसांनी मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
साताऱ्यातील वाई तालुक्यात हनी ट्रॅपद्वारे अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून एका पतीने स्वतःच्या पत्नीच्या सहाय्याने तब्बल २ लाख ८९ हजार ५०० रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत बोपेगाव येथील युवकाने तक्रार दाखल केली असून कवठे आणि सटालेवाडी येथील युवकांचीही अशीच फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
संशयित महिलेने व्हॉटस् अॅपवरून अश्लील चॅटिंग (Porn Chat) करून ते कुटुंबातील लोकांना दाखवून बदनामी करू, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग (Blackmail) करत असे. या पती पत्नीला अटक करण्यात आली आहे. पूनम हेमंत मोरे (वय 30) आणि हेमंत विजय मोरे (३१, मूळ रा. ओझर्डे, ता. वाई, सध्या रा. कुडाळ, ता. जावली) अशी संशयित पती-पत्नीचे नाव आहे. घटनेने वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. या पती-पत्नीने अजुनही अनेक युवकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात असून अशा व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Web Title: Husband and wife arrested for honey trap in Satara