Home अहमदनगर Murder: दारू पिण्यास पैसे न दिल्याने डांबरीवर आपटून एकाचा खून

Murder: दारू पिण्यास पैसे न दिल्याने डांबरीवर आपटून एकाचा खून

Murder of one by hitting asphalt for not paying for alcohol

जामखेड | Jamkhed:  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून उचलून डांबरीवर आपटल्याने एकाचा मृत्यु (Murder) झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील आपटी येथे काल घडली. जामखेड पोलीसांनी गुन्ह्याची सुत्रे गतीने फिरवत अवघ्या दोन तासात संशयितांना अटक केली आहे.

बाबासाहेब महादेव जगदाळे (वय 65, रा. आपटी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. छगन बबन गोरे (रा. आपटी) असे या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या संशियीत आरोपीचे नाव आहे.  

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आपटी गावातील पिंपळगाव रोडवरील बसस्थानकाजवळ असणार्‍या राम गोरे यांच्या दुकानासमोर हा प्रकार घडला. छबन गोरे हा बाबासाहेब जगदाळे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतु आपल्याकडे पैसे नसल्याचे जगाळे यांनी सांगताच याचा राग आल्याने गोरे याने जगदाळे यांना उचलून डांबरी रस्त्यावर आपटले.

काही लोक त्यांना सोडवण्यासाठी धावले परंतु तो पर्येंत गोरे याने दुसर्‍यांदा जगदाळे यांना उचलून डांबरीवर आपटले. यात जगदाळे यांच्या डोक्याला घाव लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तेथील नागरीकांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले पंरतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. या प्रकरणी जगदाळे यांचे जावई देवरथ गंगाराम मिसाळ (रा.आपटी) यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद आहे. या प्रकाराची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन सुचना केल्या.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चार पथके तैनात करून संशयिताचा तपास सुरू केला. एका पथकाने घटनेनंतर अवघ्या 2 तासात संशयित छबन बबन गोरे यास तालुक्यातील नान्नज येथून ताब्यात घेतले.  गोरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder of one by hitting asphalt for not paying for alcohol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here