Home Accident News Accident: नगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे अपघातात निधन

Accident: नगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे अपघातात निधन

Former member of Nagar Zilla Parishad dies in accident

Ahmednagar Accident News | अहमदनगर:  जिल्हा परिषद माजी सदस्य दत्तात्रय सदाफुले यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचे निधन झाले आहे.

नगर-जामखेड रोडवरील निबोंडी शिवारात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. सदाफुले त्यांच्या दुचाकीवरून नगर- जामखेड रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिल्याने सदाफुले जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी नगरकडे घेवून येत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

सदाफुले हे चिचोंडी पाटील (ता. नगर) गावचे रहिवासी होते. ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. त्यांच्या अपघाती निधनाने चिचोंडी गावासह नगर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Former member of Nagar Zilla Parishad dies in accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here