Home अहमदनगर स्वस्तातली कार पडली महागात, ऑनलाइन खरेदीत गंडा

स्वस्तातली कार पडली महागात, ऑनलाइन खरेदीत गंडा

Cheap car falls expensive, online shopping fraud

Rahuri | अहमदनगर | राहुरी : शहरातील एका व्यक्तीची चारचाकी वाहन खरेदीत ऑनलाइन ४८ हजारांची फसवणूक (online shopping fraud) झाल्याची घटना घडली होती. नगरच्या सायबर क्राईम विभागाने तक्रार दाखल होताच बँक खाते शोधून त्यावर जमा केलेली रक्कम गोठविण्यात आली. ही रक्कम परत मिळण्यासाठी राहुरी न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने पीडित व्यक्तीला रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.

संतोष सखाराम मोरे (रा. राहुरी) असे ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोरे यांनी फेसबुकवर जुनी वॅगनोर गाडी विक्रीची जाहिरात पाहून ते भुलले. नवीन चारचाकी वाहन खरेदीची ऐपत नसल्याने त्यांनी कार विकत घेण्याचा निर्णय घेतला. जाहिरातमधील अनोळखी व्यक्तीला संपर्क केला आणि त्याच्याशी  ४८ हजार रुपयांचा व्यवहार केला. त्या अनोळखी व्यक्तीने आर. सी. बुक व इतर कागदपत्रे पाठविल्यामुळे खात्री पटल्याने ठरलेली रक्कम अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यावर ऑनलाईन पाठविण्यात आली. मात्र नंतर गाडी मिळाली नाही. आणि नंतर अनोळखी व्यक्तीने मोबाईल नंबर बंद केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Web Title: Cheap car falls expensive, online shopping fraud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here