Home क्राईम अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, गर्भवती राहिल्याने उघडकीस

अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, गर्भवती राहिल्याने उघडकीस

Pune Crime Frequent rape of a minor girl

पुणे  | Pune Crime : एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (rape of a minor girl) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने वारंवार बलात्कार केल्याने पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सोनू उर्फ सिद्राम ज्ञानेश्वर भालेराव (वय 25) यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीचे कुटुंब हे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. आई-वडील आणि बहिण भावासह ती लोणी काळभोर परिसरात मोलमजुरी करून राहत आहे. काही दिवसांपूर्वी त्या मुलीचा पोटात दुखत असल्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेले असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

त्यानंतर आई वडिलांनी चौकशी व विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपी सिद्धाराम भालेराव हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा ओळखीतीलच आहे.  त्याचे घरी येणे-जाणे होते. एके दिवशी अल्पवयीन तरुणी घरी भांडी घासताना आरोपीने तिच्या हाताला धरून बाथरूममध्ये ओढत नेऊन  रुमालाने तोंड बांधून बलात्कार केला. आरोपीने या अल्पवयीन मुलीवर तीन ते चार वेळेस बलात्कार केला असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Pune Crime Frequent rape of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here