माजी आमदार बबन घोलप यांचा शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! शिंदे गटात?
Breaking News: शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र.
नाशिक रोड : शिवसेनेचे उपनेते व 25 वर्ष आमदार राहिलेले बबन शंकर घोलप यांनी आज गुरुवारी सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत शिवसेनाला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र केला.
बुधवार ता. १४ रोजी आदित्य ठाकरे यांची नाशिकरोड येथे जाहिर सभा होती या सभेला माजी बबनराव घोलप व योगेश घोलप, माजी महापौर नयना घोलप उपस्थित नव्हते, त्यामुळे तेथे सभेत चर्चा होती बबनराव घोलप शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत निर्णय समोर येणार आहे.
आदित्य ठाकरे यांची पाठ फिरताच दुसऱ्यादिवशी घोलप यांनी राजीनामा दिला त्यामुळे नाशिकरोड व देवळाली मतदार संघात राजकीय चर्चाना उथाण आले आहेत. बबनराव घोलप दोन दिवसात निर्णय घेणार आसुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत. बबनराव घोलप यांनी सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
“मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे.कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने (संघटनेने) जे जे सांगितले, ते प्रामाणिकपणे केले आहे. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करण्यात आले व मी ज्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना काढुन टाकले होते व नविन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे. सर्वात महत्वाच म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठच ठेवल नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संर्पक प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पदे दिली, हे सर्व पाहुन मी अचंबित आहे. नेमकं माझं काय चुकलं ते समजल नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच ऊत्तर मिळालं नाही. माझे वकिली करणारेही गप्प आहेत. त्यापेक्षा आपण थाबुंन घेणे महत्वाचे वाटते, म्हणुन मी माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे.” – बबन घोलप
Web Title: Former MLA Baban Shankar Gholap resigns from Shiv Sena Thackeray Group nashik political news
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study