Home अहमदनगर गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून पाच लाखांची फसवणूक

गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून पाच लाखांची फसवणूक

Fraud of Rs 5 lakh for claiming gas dealership

अहमदनगर | Ahmedagar: भारत गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून बनावट मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे देत एका व्यावसायिकला पाच लाख 27 हजार रुपयांची (Fraud) फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 419, 420, 468, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधि 2000 चे कलम 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नगर तालुक्यातील जेऊर येथील व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

3 फेब्रुवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही घटना घडली. शुक्रवारी, 25 फेब्रुवारी 2022 रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. भारत गॅस एजन्सीमधून असिस्टंट मॅनेजर हरीष रावत बोलतो, असे सांगण्यात आले. तुम्हाला भारत गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्यात बोलणे होऊन समोरच्या व्यक्तीने फिर्यादीला बनावट मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे पाठवून 5 लाख 27 हजार रूपये घेत त्यांची फसवणूक (Fraud) केली. सदरचे पैसे त्या व्यक्तीने युको बँकेच्या खात्यावर घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of Rs 5 lakh for claiming gas dealership

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here