Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

अहमदनगर: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

Ahmednagar Crime minor girl torture arrested 

अहमदनगर | Ahmednagar Crime: अल्पवयीन मुलीला तरूणाने तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexual assault) केल्याची नगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. याप्रकरणी अत्याचार करणार्‍या तरूणाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 376, पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर बालन शेख (वय 26 रा. आलमगीर, भिंगार) असे आरोपीचे नाव आहे. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

या गुन्ह्याचे तपासी अधिकारी नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी आरोपी शेख याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहत असणाऱ्याएका अल्पवयीन मुलीसोबत समीर शेख याची ओळख झाली होती. या ओळखीतून फायदा घेत त्याने त्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान घरातून मुलगी गेल्यामुळे तिच्या घरच्यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नोंद घेवुन तपास सुरू केला. समीर शेख व पीडित अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पूर्वी दाखल असलेल्या हरवल्याच्या गुन्ह्यात वाढीव पोक्सो, अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावले. समीर शेखला अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान या गुन्ह्यात वाढीव कलम लागल्याने सदरचा गुन्हा तपासकामी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कातकडे हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime minor girl torture arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here