Home महाराष्ट्र Accident: ट्रक कारच्या धडकेत दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू

Accident: ट्रक कारच्या धडकेत दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू

Accident father died on the spot after being hit by a truck

यवतमाळ | Accident:  यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पांढरकवडा रोड वरील वाकी फाट्याजवळ ट्रक ने कारला जोरदार धडक दिल्याने दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात हार्दिक सुनिल धुर्वे वय वर्ष 8,  सुमेध सुनिल धुर्वे वय वर्ष 5 आणि सुनिल कर्णुजी धुर्वे वय वर्ष 38 असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

यवतमाळ वरून पाटणबोरी कडे जात असताना वाकी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलांची आई नर्मता सुनिल धुर्वे ही गंभीर जखमी आहे. तिच्यावर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

Web Title: Accident father died on the spot after being hit by a truck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here