Home महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालविल्याने रुग्णालयात दाखल

मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालविल्याने रुग्णालयात दाखल

Nawab Malik Admitted J J Hospital

Nawab Malik Admitted J J Hospital :  ईडीच्या कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालाविल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे.  ईडीनं बुधवारी आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik)यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तपासणीसाठी मुंबईतील भायखळा येथे असलेल्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीची समस्या वाढल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच जवळील पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आल्याचे समजते.

Web Title: Nawab Malik Admitted J J Hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here