Home अहमदनगर अहमदनगर: उभ्या असलेल्या लक्झरी बसला आग लागून खाक

अहमदनगर: उभ्या असलेल्या लक्झरी बसला आग लागून खाक

Fire Destroy a vertical luxury bus

Ahmednagar | शिर्डी: शिर्डी शहरातील पानमळा परिसरात बेवारस उभी असलेली तेलंगणा राज्यातील वातानुकुलीत लक्झरी बस क्रमांक टि.एस.12 यु.ए.7374 ला अचानक आग (Fire) लागून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्याने यावेळी आगीचे लोळ उसळत होते.  या घटनेची माहिती समजताच शिर्डी नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र बस पुर्णतः जळून खाक झाली. या घटनेत  साधारणतः पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

शिर्डी शहरातील पानमळा परिसरात बेवारस उभी असलेली लक्झरी बस क्रमांक टि.एस.12 यु.ए.7374 ला शुक्रवार दि.25 रोजी सकाळी पाऊणेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे पेट घेतल्याने जळून खाक झाली. यावेळी वार्डातील भाजपचे उपशहराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी शिर्डी नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाला कळवले. त्यानंतर अग्निशमन बंब तसेच शिर्डी कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत होते. मात्र तोपर्यंत बस पुर्णतः जळून खाक झाली होती. ही  बस कोणत्या कारणाने पेटली कि पेटवण्यात आली याबाबत नागरिक तर्कवितर्क लढवीत असून चर्चेस उधाण आले आहे.

Web Title: Fire Destroy a vertical luxury bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here