Home क्राईम लग्न जमत नसल्याने तरुणी भोंदूबाबाकडे गेली असता तिच्यावर बलात्कार

लग्न जमत नसल्याने तरुणी भोंदूबाबाकडे गेली असता तिच्यावर बलात्कार

young woman was rape when she went to Bhondubaba

येवला | Rape Case: येवला शहरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाह जमत नसल्याने भोंदूबाबाकडे गेलेल्या पिडीत तरुणीला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार (sexually abuse) करून पिडीतेचे नको ते फोटो मोबाईलवर काढले. तसेच तिच्यासह आई व दोन बहिणींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार येवला शहरात उघडकीस आला आहे.

सर्व सर्व प्रकार मिटवून घेण्यासाठी भोंदूबाबाच्या वकील भावाने पिडीत युवतीच्या आईकडून वेळोवेळी आठ लाखांची खंडणी घेतली. याप्रकरणी येवला पोलिसांत संशियीत भोंदूबाबा सुफी अब्दुल अजीज बाबा आणि त्याचा भाऊ जब्बार शेख रा. नागडे ता. येवला यांच्याविरोधात बलात्कार (rape), अनैसर्गिक अत्याचार, जादू टोणा प्रतिबंधक कायदा आदि कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत २५ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार १७ एप्रिल २०१९ ते ३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत युवती परिचयातील अजीजबाबा यांच्याकडे लग्न जमत नसल्याने गेली होती. अजीज भोंदूबाबाने तिच्यावर जादूटोणा झाला आहे. त्याच्यावर तोडगा काढावा लागेल नाहीतर लग्न होणार नाही असे सांगत पिडीतेला गुलाब पाणी पिण्यास देत त्यात गुंगीचे औषध टाकले. शुद्ध हरपल्यानंतर संशियीत बाबाने युवतीवर अत्याचार केले. पिडीतेचे नको त्या अवस्थेत फोटो काढून आई व बहिणीवरही अत्याचार केले.  

Web Title: young woman was rape when she went to Bhondubaba

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here