सोशल मीडियावरील मैत्री, नेपाळहून आलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
Breaking News | Mumbai Crime: सोशल मीडियावरील मैत्रीचा गैरफायदा घेऊन 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा अत्याचार केल्याची घटना.
मुंबई: सोशल मीडियावरील मैत्री एका 15 वर्षीय नेपाळच्या मुलीला चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडियावरील मैत्रीचा गैरफायदा घेऊन 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील मुलगी ही नेपाळवरून बसने 17 मार्चला उत्तर प्रदेशच्या गोरखपूरला पोहोचली. त्यानंतर गोरखपूरवरून ही तरुणी ट्रेनने 19 मार्चला कल्याणला पोहोचली होती. कल्याणमध्ये आरोपीची पीडित मुलीसोबत कल्याण रेल्वे स्टेशनला भेट झाली.
एका महिन्यांपूर्वी 22 वर्षीय तरुणाची सोशल मीडियावर नेपाळमधील 15 वर्षीय मुलीची ओळख झाली. त्यांनी एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाण घेवाण केली. त्यानंतर दोघांनी चॅटिंग सुरु केली. या तरुणाने मुलीला लग्नाचे आश्वासन दिलं आहे. त्याने या मुलीला महाराष्ट्रात बोलावलं. नेपाळमधील या मुलीने तिच्या या मैत्रीविषयी कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली नाही. मुलीने एकट्याने मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली.
नेपाळमधील मुलगी ही नेपाळवरून बसने 17 मार्चला उत्तर प्रदेशच्या गोरखपूरला पोहोचली. त्यानंतर गोरखपूरवरून ही तरुणी ट्रेनने 19 मार्चला कल्याणला पोहोचली. त्यानंतर आरोपीची पीडित मुलीसोबत कल्याण रेल्वे स्टेशनला भेट झाली. त्यानंतर या तरुणाने तिला रिक्षाने मुंब्रा येथील भाडेतत्वावरील एका घरात नेलं. या घरात तरुणाने या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर या तरुणाने मुलीला दिवा स्टेशनला सोडलं. पीडित मुलगी दिव्यावरून दादरला पोहोचली. या प्रवासादरम्यान, प्रवासी व्यक्तीला तिच्यासोबत विपरीत झाल्याचे कळाले. या व्यक्तीने पीडितेला सार्वजनिक रुग्णालयात दाखल केलं. मुलीच्या मोबाईल क्रमांकाला ट्रॅक करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Web Title: Friendship on social media, 15-year-old girl from Nepal abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study