Home Accident News कारचा टायर फुटून भीषण अपघात; तीन ठार, पाच जण जखमी

कारचा टायर फुटून भीषण अपघात; तीन ठार, पाच जण जखमी

Breaking News | Amravati Accident: भरधाव कारचा टायर फुटल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात पिता-पुत्रासह तिघांचा मृत्‍यू.

accident with car tire burst Three killed

अमरावती : भरधाव कारचा टायर फुटल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात पिता-पुत्रासह तिघांचा मृत्‍यू झाला, तर पाच जण जखमी झाल्याची घटना भातकुली नजीक सोमवारी रात्री घडला. जखमींवर सध्‍या रुग्‍णालयात उपचार सुरू आहे.

कलीम खान सलीम खान (३६), सलीम खान मेहमूद खान (६५) आणि रुबिना परवीन कलीम खान (३२) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत.

कलीम खान हे आपल्‍या कुटुंबीयांसमवेत अकोला येथून अमरावतीकडे येत होते. भातकुलीनजीक त्‍यांच्‍या कारचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणात कार अनियंत्रित होऊन उलटली. अपघात एवढा भीषण होता की कार तीन ते चार वेळा उलटून रस्‍त्‍याच्‍या कडेला शेतात शिरली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्‍यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्‍थानिक नागरिकांनी घटनास्‍थळी धाव घेतली. अपघाताची सूचना पोलिसांना देण्‍यात आली. रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्‍णालयात हलविण्‍यात आले.

Web Title: accident with car tire burst Three killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here