Home क्राईम खळबळजनक! नोकरीसाठी आलेल्या महिलेवर ‘गँगरेप’

खळबळजनक! नोकरीसाठी आलेल्या महिलेवर ‘गँगरेप’

Nagpur Crime: नोकरी करण्यासाठी नागपुरात आलेल्या मध्यप्रदेशातील एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनी रात्रभर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना.

Gang rape on a woman who came for Job

नागपूर: नोकरी करण्यासाठी नागपुरात आलेल्या मध्यप्रदेशातील एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

रत्नदीप ऊर्फ पिंटू गजभिये (३९), रा. रमना मारोती आणि कार्तिक चौधरी (५०), रा. बिनाकी लेआऊट अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केला. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर बलात्कार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशच्या सिहोरमध्ये राहणारी ३२ वर्षीय महिला घटस्फोटित आहे. तिला दोन मुले आहे. तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर पिंटूशी तिची मैत्री झाली. तेव्हापासून दोघांमध्ये चॅटिंग सुरू होती. महिला नोकरीच्या शोधात होती. पिंटूने तिला नागपुरात नोकरी मिळाल्याचे सांगितले.

२१ जूनला महिला बसने मध्यप्रदेश बसस्थानकावर आली. पिंटू आणि कार्तिकने तिला नोकरीसाठी कार्यालयात नेण्याचा बहाणा केला. रस्त्यात शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिळवून तिला पाजले. त्यानंतर महिलेला उमरेड मार्गावर डोंगरगाव परिसरातील एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. बेशुद्धावस्थेत दोघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी महिला शुद्धीवर आली. तिने जाब विचारला असता पिंटूने तिला ठार मारण्याची धमकी दिली. तिला दिघोरीमध्ये एका मैत्रिणीच्या घरी सोडून ते दोघे पसार झाले. महिलेने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Gang rape on a woman who came for Job

See also: Latest Marathi News, Sangamner News Ahmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here