Home क्राईम मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, मोठे रॅकेट उघडकीस, तीन महिलांची सुटका

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, मोठे रॅकेट उघडकीस, तीन महिलांची सुटका

Pune Crime: पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostitution) करणारे रॅकेट पोलिसांच्या छाप्यात (raid) उघडकीस तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तिघांवर गुन्हा दाखल.

Prostitution in the Name of a massage center, big Sex racket busted, three women freed

पुणे : धानोरी परिसरातील महादेवनगर या ठिकाणी पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट (Sex racket) पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेश्याव्यवसायातून तीन महिलांची सुटका केल्याची करण्यात आली. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार मनीषा सुरेश पुकाळे यांनी आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी रंजना सनातून सिंगदेवी (वय ३५, रा. धानोरी, पुणे, मूळ राहणार आसाम) या महिलेस अटक करण्यात आली आहे. तिचे साथीदार सुरेश शाहू आणि पूजा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धानोरी येथील महादेवनगर या ठिकाणी गुडविल स्क्वेअर येथील प्रीमियम युनिक सलूनमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर माहितीबाबत खातरजमा करत, संबंधित पाच सेंटरवर छापा टाकून पीडित तीन महिलांची सुटका केली. संबंधित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका करताना आरोपी मिळून आलेले आहेत. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस ढवळे अधिक  तपास करत आहे.

Web Title: Prostitution in the Name of a massage center, big Sex racket busted, three women freed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here