Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, एक शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, एक शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

CM Eknath Shinde: नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश.

Big blow to Uddhav Thackeray, Shiv Sena of CM Eknath Shinde

मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती. पक्ष प्रवेशानंतर नीलम गो-हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. तसेच, सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे. आता, सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन नीलम गो-हेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्या शिंदेच्या शिवसेनेत का गेल्या हेही अंधारेंनी सांगितले आहे.

सुषमा अंधारे यांचे ट्विट

तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापती पद भूषवणाऱ्या पुरोगामी (?) नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्य मंत्री पदासाठी ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन ॥

का केला पक्षप्रवेश आणि सुषमा अंधारेना प्रत्युत्तर

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितले. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचे नीलम गो-हे यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला, असेही त्यांनी म्हटले. तसेच, उपस्थित पत्रकारांनी सुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता, सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते, असेही गो-हे यांनी म्हटले.

Web Title: Big blow to Uddhav Thackeray, Shiv Sena of CM Eknath Shinde

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here