‘समृद्धी’वरील बसचा अपघात: चालकाबाबत आली धक्कादायक माहिती समोर
Samruddhi Bus Accident: नशेत बस चालवत असल्याची बाब समोर आली आहे. रक्त नमुन्यामध्ये ०.०३ टक्के अल्कोहोल.
सिंदखेडराजा | बुलढाणा: समृद्धी महामार्गावर १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला होता. या बसचा चालक मद्याच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील फॉरेन्सीक अहवाल आला असून चालक दानिश शेख इसराईल याच्या रक्त नमुन्यामध्ये ०.०३ टक्के अल्कोहोल आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो मद्याच्या नशेत बस चालवत असल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, आरोपी चालक शेख दानिश शेख इसराईल याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर ५ जुलैला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर तब्बल १२ तासांनी त्याचे रक्त नमुने घेण्यात आले होते. इतक्या उशिरा रक्त नमुने घेऊनदेखील त्याच्या सांगितले.
रक्तात अल्कोहोल आढळून आल्याने त्याने मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले होते, हेही स्पष्ट झाले आहे. या घटनेत दानिशबरोबर असलेला बसचा सह चालक, ट्रॅव्हल कंपनीचा मालक यांच्यावरदेखील गुन्हा दखल होऊ शकतो का हे पाहावे लागणार आहे. घटनेचा अत्यंत बारकाईने तपास केला जात असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी
Web Title: Bus accident on Samriddhi Shocking information about the driver
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App