Home अकोले गणोरे: काम सुरू करण्याच्या अटीवर गांधीगिरी करीत ठिय्या आंदोलन मागे

गणोरे: काम सुरू करण्याच्या अटीवर गांधीगिरी करीत ठिय्या आंदोलन मागे

गणोरे: काम सुरू करण्याच्या अटीवर गांधीगिरी करीत ठिय्या आंदोलन मागे

गणोरे: विरगाव गणोरे रस्त्याच्या कामासाठी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी संगमनेर  सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांचे कार्यालयात ठिय्या आंदोलन १८ नोव्हेंबर पासून काम सुरू करण्याच्या अटी वर मागे घेण्यात आला.
          अकोले तालुक्यातील राज्यमार्ग क्र. 20 विरगाव ते संगमनेर या रस्त्याचे विरगाव फाटा ते गणोरे अकोले तालुका हद्दी पर्यंत च्या रस्त्याला महाराष्ट्र सरकारने मार्च २०१७ ला प्रशासकीय मान्यता दिली. सव्वा आठ किलोमीटर रस्ता मंजूर केला आहे तसेच या कामाचा कार्यारंभ आदेश जुलै २०१८ मध्ये देऊनही कामास सुरवात होत नसून अतिशय वाईट अवस्था या रस्त्याची झाली आहे त्यामुळे जनतेत अत्यंत नाराजी आहे. प्रवाशांचे खूप हाल होत असून जनता त्रस्त झाली आहे.
      यामुळे देवठाण गटाचे जिप सदस्य जालिंदर वाकचौरे व भाजप कार्यकर्त्यांनी संगमनेर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय पवार यांचे समोर गांधीगिरी करीत ठिय्या आंदोलन सुरू केले.
        यावेळी संजय पवार यांनी ठेकेदार यांचेशी संपर्क साधून काम तातडीने सुरू करण्याचे सांगितले. १८ नोव्हेंबर पासून काम सुरू करन्याचे आदेश त्यांनी दिले
. १८ नोव्हेंबर ला काम सुरू झाले नाहीतर १९ नोव्हेंबर पासून उपोषणला बसण्याचा इशारा जालिंदर वाकचौरे यांनी दिला.
       यावेळी भाजप तालुका संघटन सरचिटणीस  भाऊसाहेब वाकचौरे, माधव ठुबे, किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सूर्यभान दातीर, ईश्वर वाकचौरे, सावळेराम गायकवाड, किसन आंबरे, डॉ अविनाश कानवडे, वाल्मिक देशमुख, सुनील उगले डॉ सचिन दातीर, मदन आंबरे, हरिदास माने, प्रवीण सहाणे, रवी घुले, गणेश उगले, गणेश पवार, नानासाहेब खतोडे, बाळासाहेब दातीर, सूर्यभान आहेर, बाळासाहेब आहेर, आदीनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला.

Website Title: Ganore Back the movement by Gandhiji on the condition of starting the work


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here