Home पुणे वसतिगृहचालकाने मारहाण केल्यामुळे ‘त्या’ तरुणीची आत्महत्या

वसतिगृहचालकाने मारहाण केल्यामुळे ‘त्या’ तरुणीची आत्महत्या

Breaking News | Pune Crime: विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसतिगृहचालकाला खडक पोलिसांनी अटक.

girl commits suicide due to being beaten up by the hostel manager

 पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने सोमवारी (दि. ८) आत्महत्या केली होती. गुरुवार पेठ येथील फॉर्च्यून लिव्हिंग हब गर्ल्स हॉस्टेलमध्ये ती राहत होती. या विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसतिगृहचालकाला खडक पोलिसांनी अटक केली. वसतिगृहात भरलेली अनामत रक्कम परत मागितल्याने वसतिगृहचालकाने तिला मारहाण केली. अपमानित झाल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सुनील परमेश्वर महानोर (वय ५१, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्या वसतिगृहचालकाचे नाव असून, त्याला अटक केली आहे. अभिलाषा महेंद्र मित्तल (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अभिलाषाचे वडील महेंद्र (वय ५२, रा. चंद्रकला निवास, जालना) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिलाषा गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. गुरुवार पेठ येथील फॉच्र्युन लिव्हिंग हब गर्ल्स हॉस्टेलमध्ये ती राहत होती. आरोपी महानोर गर्ल्स हॉस्टेल चालवीत आहे.

अभिलाषाला वसतिगृह बदलायचे होते. रविवारी (७ एप्रिल) सायंकाळी तिने वसतिगृहचालक महानोर याच्याकडे वसतिगृहात भरलेली अनामत रक्कम मागितली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या घटनेची माहिती अभिलाषाने आई-वडिलांना दिली. अभिलाषाने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर महानोर याने महेंद्र मित्तल यांच्याशी संपर्क साधला. तुमची मुलगी चक्कर येऊन पडली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे सांगितले. त्यानंतर मित्तल पुण्यात आले. मुलगी अभिलाषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांना समजली. त्यानंतर मित्तल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वसतिगृहचालक महानोरने मुलगी अभिलाषाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या त्रासामुळे तिने आत्महत्या केल्याची फिर्याद मित्तल यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: girl commits suicide due to being beaten up by the hostel manager

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here