Home औरंगाबाद लॉजमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय, लॉज मालकास कोठडी

लॉजमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय, लॉज मालकास कोठडी

Breaking News |Prostitution:  लॉजमध्ये धाड टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश.

Prostitution by women in lodges, lodge owner jailed

धाराशिव : शहरातील आंबेहोळ रस्त्यावरील लॉजमध्ये धाड टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी लॉजमधील २ पीडित महिलांची सुटका केली. लॉजमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजमालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोमवारी (दि.८) दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी धाराशिव येथील न्यायालयात हजर केले असता त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

रस्त्यावरील हॉटेल बालाघाट कॅफेटेरिया व्हेज नॉनव्हेज बिअरबार रेस्टॉरंट अॅन्ड लॉज येथे लॉजमालक किरण महादेव गुरव (३३, धाराशिव) हा महिलांना आश्रय देवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यावरून धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या लॉजवर धाड टाकली. यावेळी लॉजमालक गुरव हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी २ महिलांना आश्रय देत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या पीडितांची सुटका केली. तसेच लॉजमालकास ताब्यात घेतले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी अटकेतील आरोपीस धाराशिव येथील न्यायलयात हजर केले असता त्यास १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ओव्हाळ हे करीत आहेत.

Web Title: Prostitution by women in lodges, lodge owner jailed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here