अंगावर वीज (lightning) पडून शेतमजूर युवती ठार झाल्याची घटना.
अमळनेर | जळगाव : अंगावर वीज पडून शेतमजूर युवती ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी नगाव खुर्द ता. अमळनेर येथे घडली.
निरगली मुका पावरा (१७) असे या ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. नगाव खुर्द येथे परराज्यातून कुटुंबासह आलेली निरगली ही रविवारी शेतात मजुरीने गेली होती.
रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे मजूर महिला गावाकडे परतत होत्या. त्याचवेळी मागे राहिलेल्या निरगलीवर वीज कोसळली. त्यात ती जागीच ठार झाली. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Girl killed by lightning
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App