Home पुणे तरुणीने प्रेमाचे नाटक करून ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

तरुणीने प्रेमाचे नाटक करून ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

तरुणाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रूपये, सोन्याचे दागिने घेऊन त्रास दिल्याने तरुणाने प्रेयसी राहत असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).

young woman blackmails by pretending to be in love; Youth suicide

पुणे : प्रेमाचे नाटक करून तरुणाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रूपये, सोन्याचे दागिने घेऊन त्रास दिल्याने तरुणाने प्रेयसी राहत असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

युवराज मल्हारी सोनवणे (३१, रा. टिटवाळा, कल्याण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. असून खडकीतील संबंधित तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

युवराजचे ज्योती गिरी हिच्याशी २०१७ पासून प्रेमसंबंध होते. ज्योती प्रेमाचे नाटक करून युवराज व तिचे एकत्र असलेले फोटो व व्हिडिओ इतरांना पाठविण्याची व पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत वेळोवेळी ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतरही ती त्याच्याकडे पैशांची मागणी करत मानसिक त्रास देत होती. १४ मार्च रोजी युवराज घरातून बाहेर पडला. तो थेट तरुणी राहत असलेल्या खडकीतील इडब्ल्यूएस सोसायटीत आला. त्याचा तिच्याबरोबर वाद झाल्यानंतर त्याने याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरील जिन्यात गळफास लावून आत्महत्या केली.

Web Title: young woman blackmails by pretending to be in love; Youth suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here