Home महाराष्ट्र दहावी-बारावीचे निकाल रखडणार

दहावी-बारावीचे निकाल रखडणार

HSC SCC Result 2023: शालेय कामकाजाचे अनेक ठिकाणी तीनतेरा वाजले असून, अध्यापन, परीक्षा व दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम थांबले.

HSC SCC Result 2023 will be withheld

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या १६ लाख कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख शिक्षकांचा समावेश आहे. यामुळे शालेय कामकाजाचे अनेक ठिकाणी तीनतेरा वाजले असून, अध्यापन, परीक्षा व दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम थांबले आहे. याचा फटका विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, निकालांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य शिक्षक परिषदेच्या झालेल्या ५० प्रतिनिधींच्या बैठकीत येत्या काळातील परीक्षांवर बहिष्कार टाकला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत दहावीच्या परीक्षांना सहकार्य करण्यात आले असले तरी यापुढे इतर वर्गांच्या वार्षिक परीक्षा, त्यांचे निकाल, दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी यावरचा बहिष्कार अधिक तीव्र होईल, असा इशारा राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिला आहे.

संपावर असलेले सर्व शिक्षक राज्यभरातील निरीक्षक कार्यालये, शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर आज, सोमवारी निदर्शने करणार असून, शाळा-महाविद्यालयांसमोर दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत थाळीनाद करणार आहेत.

मात्र, ज्या शाळेत त्या वेळेत दहावीची बोर्डाची परीक्षा असेल तेथे परीक्षेच्या वेळेत थाळीनाद न करता सोयीनुसार थाळीनाद आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने स्पष्ट केले आहे.

Web Title: HSC SCC Result 2023 will be withheld

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here