Home अकोले अकोले घटना: नदीत बुडून शेतमजुराचा मृत्यू

अकोले घटना: नदीत बुडून शेतमजुराचा मृत्यू

Akole News: वाघापूर येथे नदीत बुडून एका आदिवासी समाजातील शेतमजुराचा मृत्यू (dies) झाल्याची घटना.

Akole Farm laborer dies after drowning in river

कोतूळ : अकोले तालुक्यातील वाघापूर येथे नदीत बुडून एका आदिवासी समाजातील शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची कुजबुज सुरु आहे.  तीन दिवस हे प्रकरण गोपनीय ठेवून नंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

कोतूळ परिसरातील विलासनगर (पिसेवाडी) येथील सोमनाथ विठ्ठल डोके हे शेत मजुरीचे काम करीत होते. पाच ते सहा दिवासंपुर्वी ते पोहण्यास तरबेज असल्याने वाघापूर ता. अकोले येथील एका बागायतदराने त्यांना नदीत असलेला नादुरस्त वीजपंप काढण्यासाठी बोलावले. यावेळी सोमनाथ डोके व अन्य दोघे नदीवर गेल्याचे अनेकांनी पाहिले.  तीन दिवस डोके यांचे कपडे व दुचाकी नदीच्या काठावर होती. तिसऱ्या दिवशी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आल्यावर डोके यांच्या कुटुंबियाला कळविण्यात आले. मात्र तोपर्यंत कोणतीही खबर पोलिसांना नव्हती. डोखे यांच्याबरोबर असलेले इसम गायब का झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नदीपात्रात विद्युत पंपाला विद्युत प्रवाह असल्याने हा मृत्यू झाला, अशी चर्चा असली तरी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सध्या डोके यांचे दोन अल्पवयीन मुले, पत्नी, वृद्ध आई- वडील यांच्यावर दबाव आणून हे प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी धडपड सुरू केली याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर तळपे सखोल तपास करीत आहे.

Web Title: Akole Farm laborer dies after drowning in river

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here