Home Accident News समृद्धी महामार्गावर कार उलटून बालिकेचा मृत्यू, चार जखमी

समृद्धी महामार्गावर कार उलटून बालिकेचा मृत्यू, चार जखमी

समृद्धी महामार्गावर कार उलटून झालेल्या अपघातात (Accident) तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना.

Girl dies, four injured after car overturns on Samriddhi highway Accident

बुलढाणा: महामार्गावर डोणगावनजीक कार उलटून झालेल्या अपघातात तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना १७ मार्चला मध्यरात्री घडली. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्गावर शिर्डीकडून नागपूरकडे जाताना, गोहगाव ते बेलगाव शेत शिवाराजवळ एमएच ०१ – बीवाय- ४२२१ क्रमांकाची कार उलटली. यामध्ये सोलापूरहून भंडारा येथे लग्नसोहळ्याचे साहित्य घेऊन सिद्धीकी परिवार घरी जात होते. शुक्रवारी रात्री १ च्या सुमारास झालेल्या या अपघातात कुलसूम सिद्धीकी (3) हिचा मृत्यू झाला असून, सद्दाम सिद्धीकी (३२), गुलाम सिद्धीकी (२३), अकलीम सिद्धीकी (९), सादिक सिद्धीकी (२८, समृद्धी सर्व ४ रा. म्हाडा कॉलनी, भंडारा) हे जखमी झाले. त्यांच्यावर मेहकरमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्तांनी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना हात दिला, पण कुणी थांबले नाही. अखेर गस्तीवरील वाहन आले व मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास मदत मिळाली. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात हलविण्यात आले तेथे कुलसूम सिद्धीकी हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Web Title: Girl dies, four injured after car overturns on Samriddhi highway Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here