Home पुणे अकराव्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

अकराव्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

Pune News: त्यानंतर नामांकित कंपनीत चांगली नोकरी मिळाली. तरीही आनंद नाही, असे म्हणत इंजिनिअर तरुणाने आत्महत्या (Suicide) केली.

young engineer committed suicide by jumping from the eleventh floor

पिंपरी: विविध परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले, त्यानंतर नामांकित कंपनीत चांगली नोकरी मिळाली. तरीही आनंद नाही, असे म्हणत इंजिनिअर तरुणाने आत्महत्या केली. राहत्या घराच्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून अभियंत्याने आत्महत्या केली. चिखली येथे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.

वीरेन चंद्रशेखर जाधव (वय २७, रा. रिव्हर रेसिडेन्सी, चिखली. मूळ रा. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता असलेला वीरेन हा शहरातील एका नामांकित कंपनीत काम करत होता. त्याच्या मामाच्या आहेत.

रिव्हर रेसिडेन्सी या हाउसिंग सोसायटीमधील फ्लॅटमध्ये तो राहत असे. त्याची आई त्याच्याकडे अधूनमधून येत असे. शनिवारी सकाळी अकराव्या मजल्यावरून त्याने उडी मारली. सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वीरेन याला विविध परीक्षांमध्ये चांगले गुण मिळाले. तसेच त्याला नामांकित कंपनीत चांगली नोकरी मिळाली. मात्र, तरीही आनंद नाही, असे म्हणत त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एक चिठ्ठी मिळाली असून, चिखली पोलिस तपास करीत आहे. 

Web Title: young engineer committed suicide by jumping from the eleventh floor

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here