Home क्राईम मुलीला देवीसारखे नटवू सोनेही मिळेल; पण त्यासाठी…. भोंदू अटकेत

मुलीला देवीसारखे नटवू सोनेही मिळेल; पण त्यासाठी…. भोंदू अटकेत

Beed Crime: भानामती करून त्याने गावातील अनेक लोकांना आतापर्यंत लुटले. (arrested)

a girl will also get gold to look like a goddess; But for that impostor arrested

बीड : तुझ्या मुलीची उंची पावणेसहा ते सहा फूट भरते. तिची रास आमच्या नियमात बसते. तिला पुण्याला घेऊन जायचं आहे. तिला देवीसारखे नटवून तिची पूजा करायचीय. त्यामुळे तुम्हाला सोने मिळेल; परंतु यासाठी तिचा बळी द्यावा लागेल, असे म्हणून अघोरी कृत्य करण्याचा डाव आखणाऱ्या भोंदूबाबाविरोधात अंमळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार १८ ऑक्टोबर रोजी पाटोदा तालुक्यातील कोतन येथे घडला आहे.

दादाराव रघुनाथ घोशीर (७५, रा. कोतन, ता. पाटोदा) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. भानामती करून त्याने गावातील अनेक लोकांना आतापर्यंत लुटले होते. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी त्याने गावातीलच एका मजुराची भेट घेतली. त्याला सोने मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तुझ्या १६ वर्षांच्या मुलीची उंची ही आमच्या नियमात बसते. तिला पुण्याला घेऊन जावे लागेल, असे मुलीच्या वडिलांना सांगितले.

यावर तिच्या वडिलांनी विचारताच तुझ्या मुलीला देवीसारखे नटवायचे आहे, यामुळे तुला सोने मिळेल; परंतु यासाठी मुलीचा बळी द्यावा लागेल, असे सांगितले. यावर त्या मुलीचे वडील संतापले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: a girl will also get gold to look like a goddess; But for that impostor arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here