Home नागपूर संतापजनक! मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणला चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार

संतापजनक! मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणला चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार

Rape Case : मुलीची मैत्रिण घरात एकटी असल्याची संधी साधून चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीनं तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना.

Girl's minor friend rape by luring her with chocolate

हिंगाना: आपल्या मुलीची मैत्रिण घरात एकटी असल्याची संधी पाहून नराधमानं तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीला तातडीनं अटक केली आहे. विनोद असं बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. पीडित मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून आरोपीनं तिच्यासोबत संतापजनक प्रकार केल्यामुळं नागपूरात खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नागपूर जिल्ह्यातील हिंगणामध्ये आरोपी विनोदची मुलगी तिच्या १० वर्षीय मैत्रिणीला घेऊन घरी आली होती. त्यावेळी मुलगी काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आरोपीनं मुलीच्या मैत्रिणीशी अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. परंतु फार वेळ होऊनही मुलगी घरी न आल्यानं आरोपीनं या संधीचा गैरफायदा घेत मुलीवर बळजबरीनं बलात्कार केला. त्यानंतर आरोपीनं मुलीला तिच्या घरी सोडून दिलं. घाबरलेल्या मुलीनं या प्रकरणाची माहिती कुणालाही दिली नाही. परंतु जेव्हा पीडितेच्या आईनं चॉकलेट कुणी दिलं होतं?, असा प्रश्न केल्यानंतर पीडित मुलीनं घडलेला सारा प्रकार आईला कथन केला.

आरोपीनं बलात्कार केल्याची माहिती पीडित मुलीनं आईसह शिक्षिकेला सांगितली. त्यानंतर आरोपीच्या घाणेरड्या कृत्याचा भांडाफोड झाला. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला प्रकरणाचा जाब विचारल्यावर त्यानं माफी मागण्यास सुरुवात केली. परंतु संतापलेल्या पीडितेच्या वडिलांनी हिंगणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी विनोदवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title: Girl’s minor friend rape by luring her with chocolate

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here