Home क्राईम संगमनेर: पोलिस असल्याची बतावणी करून हातचलाखीने एकास लुटले

संगमनेर: पोलिस असल्याची बतावणी करून हातचलाखीने एकास लुटले

Sangamner Robbed: पोलीस असल्याची बतावणी करीत हातचलाखीने एका भामट्याने ७५ वर्षीय एका वृद्धाला लुटल्याची घटना.

Sangamner robbed one by pretending to be a policeman

संगमनेर:  पोलीस असल्याची बतावणी करीत हातचलाखीने एका भामट्याने ७५ वर्षीय एका वृद्धाला लुटल्याची घटना घडली आहे. आश्वी खुर्द येथे भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आश्वी खुर्द येथील सयाजी उमाजी मुके (वय ७५) हे आश्वी खुर्द येथील गुरुवारच्या बाजारच्या दिवशी आश्वी खुर्द- शिबलापूर रस्त्याने जात होते, त्या दरम्यान दुपारी एक वाजता या रस्त्यावरील भैरवनाथ मंदिराजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एका भामट्याने अडवून त्यांना आपण पोलीस असून तुमची तपासणी करायची आहे असे सांगून मुके यांच्या खिशातील सर्व सामान बाहेर काढण्यास सांगितले. या वेळी संबंधित भामट्याने हातचलाखीने सयाजी मुके यांच्याकडील ४० हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज काढून घेऊन पोबारा केला. त्यानंतर काही वेळाने सयाजी मुके यांना आपल्याला लुबाडण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आश्वी पोलीस ठाणे गाठत आपबीती सांगितली.  त्यानंतर आश्वी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी पोलीस असल्याचीच बतावणी करत कोल्हार- घोटी राज्य मार्गाने घरी जात असणाऱ्या रहिमपूर येथील अण्णासाहेब बाबुराव शिंदे यांनाही दोघा भामट्यांनी वडगाव पान नजीक भर दिवसा लुटले होते. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले.

Web Title: Sangamner robbed one by pretending to be a policeman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here