Home महाराष्ट्र मोदी सरकारचा मास्टर प्लॅन, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

मोदी सरकारचा मास्टर प्लॅन, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

Petrol-Diesel Price: मोदी सरकारचा मास्टर प्लॅन, कच्चे तेल मिळविण्यासाठी भारताने इतर देशांशीही हातमिळवणी केली.

Petrol-Diesel Price will be cheaper

नवी दिल्ली: गरिकांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून रडविणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार आहेत. आता ही माहिती सूत्रांनी नाही तर दस्तूरखुद्द पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. डिझेलच्या किंमती वाढल्याने माल वाहतूक महागली. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीत झाला आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती कमी झाल्या तर देशातील महागाई काबूत ठेवण्यासाठीची केंद्र सरकारची कसरत थांबेल. एका वर्षांनी देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. काही राज्यातही विधानसभा निवडणुका लागतील. त्याअगोदरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलमध्ये कपातीची खेळी खेळणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आता याप्रकरणात केंद्र सरकारची बाजू पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडली आहे. हरदीप सिंह पुरी यांनी इंडिया एनर्जी वीकमध्ये याविषयीची माहिती दिली. देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी भारत जिथे स्वस्तात कच्चे तेल मिळेल, तिथून ते खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने रशियाशी व्यापारी संबंध तोडण्यासाठी पश्चिमी देश आणि अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढविण्यात आला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर ठाम राहिले. आताही स्वस्त इंधनासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये रशियाकडून भारत केवळ 0.20 टक्के कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करत होता. त्यानंतर आता हा वाटा 25 टक्क्यांवर पोहचला आहे. भारत रशियाकडून दररोज 909403 बॅरलहूनही अधिक कच्चे तेल आयात करत आहे. आता कच्चे तेल मिळविण्यासाठी भारताने इतर देशांशीही हातमिळवणी केली आहे.

सध्या भारत जागतिक तेल उत्पादक देशांकडून कच्चे तेल खरेदीवर भर देत आहे. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे. कोलंबिया, रशिया, लिबिया यासह छोट्या राष्ट्रांकडूनही भारताने इंधन आयात सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Petrol-Diesel Price will be cheaper

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here