Home महाराष्ट्र Gokul Election Result 2021 : गोकुळ निवडणुकीत पाचव्या फेरी अखेर हे उमेदवार...

Gokul Election Result 2021 : गोकुळ निवडणुकीत पाचव्या फेरी अखेर हे उमेदवार आघाडीवर

Gokul Election Result 2021 

Gokul Election Result 2021 : गोकुळ निवडणुकीच्या निकालाबाबत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आजपर्यंत पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून अजून चार फेऱ्या शिल्लक आहे. 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीत आज सायंकाळी सव्वा सहा वाजता संपलेल्या पाचव्या फेरी अखेर विरोधी आघाडीचे १२ तर सत्तारूढ आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. आणखी चार फेऱ्या शिल्लक असून असेच कल राहण्याची चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे सत्तातरण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सत्तारूढ आघाडीतून अंबरिश घाटगे, चेतन नरके, वसंत खाडे व उदय निवासराव पाटील सडोलीकर हे आघाडीवर आहेत. संघाचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे, जेष्ठ संचालक रणजीतसिंह पाटील मुरगुडकर हे पिछाडीवर आहेत. पाचव्या फेरीअखेर अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील, अजित नरके हे सर्वांत आघाडीवर आहे. विरोधी आघाडीतील वीरेंद्र मंडलिक, विद्याधर गुरबे, एस. आर. पाटील, महाबालेश्वर चौगुले हे उमेदवार मागे आहेत.

Web Title: Gokul Election Result 2021 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here