Home अहमदनगर प्रेमविवाह केला, घरी आले  आणि  त्या नववधूसोबत घडले  धक्कादायक! राहुरीची घटना

प्रेमविवाह केला, घरी आले  आणि  त्या नववधूसोबत घडले  धक्कादायक! राहुरीची घटना

Ahmednagar | Rahuri News:  आळंदी येथे प्रेमविवाह करून आलेल्या नववधूचे १५ ते २० अनोळखी नातेवाइकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Got married, came home and a shocking thing happened to the bride

राहुरी:  आळंदी येथे प्रेमविवाह करून आलेल्या नववधूचे १५ ते २० अनोळखी नातेवाइकांनी अपहरण केल्याची घटना दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी तालुक्यातील टाकळी मियाँ येथे घडली.

याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात भुवन दादासाहेब गुंड (वय २२, रा. टाकळी मियाँ) यांच्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांविरोधात अपहरणाचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुवन गुंड व प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी पळून जाऊन कायदेशीर लग्न केले. त्यानतंर ते प्रेमीयुगुल २९ नोव्हेंबर रोजी राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबात समझोता घडवून आणला. त्यानंतर हे नवविवाहित जोडपे टाकळी मियाँ येथे गेले. त्यानंतर तेथे १५ ते २० अनोळखी इसमांनी नववधूला बळजबरीने चारचाकी गाडीत बसवून पळवून नेले.

Web Title: Got married, came home and a shocking thing happened to the bride

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here