Home अहमदनगर अहमदनगर: बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २१ लाखांची फसवणूक

अहमदनगर: बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २१ लाखांची फसवणूक

Ahmednagar News:  गुंतवणुक करुन चांगल्या  प्रकारे  फायदा करुन देण्याचे आमिष दाखवत नगरच्या बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना, ४ महिलांसह ७ जणांवर गुन्हा दाखल.

2 Crore 21 Lakh fraud of a builder

अहमदनगर : एअरलाईनमध्ये तिकिट ब्लॉकींगसाठी गुंतवणुक करुन चांगल्या  प्रकारे  फायदा करुन देण्याचे आमिष दाखवत नगरच्या बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तसेच पैसे परत मागितले म्हणून पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी ४ महिलांसह ७ जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल वसंत सोमणी (रा. पत्रकार वसाहत, अ.नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

नगरमधील लिओ हॉलीडेस टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीचे संचालक अजयकुमार बाळासाहेब जगताप, बाळासाहेब गंगाधर जगताप, जयश्री बाळासाहेब जगताप, तेजश्री बाळासाहेब जगताप, मनोज जगताप, (रा. संभाजी कुस्ती केंद्र जवळ, गोकुळनगर, भिस्तबाग, सावेडी), रुपाली विजय मुनोत, दिपाली विजय मुनोत (रा. बालिकाश्रम रोड, (अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी सोमणी यांना सदरील आरोपी यांनी आमची लिओ हॉलीडेस टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या नावाने नोंदणीकृत कंपनी आहे. त्यामध्ये करुन त्याबदल्यात चांगल्या प्रकारे मोबादला करुन देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून सुमारे २ कोटी २१ लाख रुपयांची गुंतवणूक करून  घेतली. पैशाची वेळोवेळी मागणी करुनही पैसे दिले नाही. नंतर अजयकुमार जगताप व तेजश्री जगताप यांनी ‘आम्ही तुमचे पैसे देवू शकत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’, असे सांगितले. त्यावर सोमणी यांनी ‘माझे पैसे दिले नाहीतर तुमच्यावर केस करील’ असे म्हणाले असता तेजश्री जगताप व दिपाली मुनोत यांनी त्यांना धक्काबुक्की केली तर मनोज जगताप याने पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: 2 Crore 21 Lakh fraud of a builder

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here