अहमदनगर: नदीत ग्रामपंचायत कर्मचारी गेला वाहून, शोध मोहीम सुरु
Ahmednagar Sina River: सीना नदीस पूर आलेला असताना नदी ओलांडताना वाहून जाण्याची दुर्दैवी घटना.
कर्जत: कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना नदीच्या पुरामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे.
अशोक गंगाधर गांगर्डे असे त्यांचे नाव असून ते सीना नदीस पूर आलेला असताना नदी ओलांडताना वाहून जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटना घडून 72 तास झाले तरीदेखील अशोक गांगर्डे यांचा शोध लागलेला नसून. त्यांना शोधण्यासाठी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील विशेष पथके दाखल झाली आहेत. त्यांनी सीना नदीपात्रामध्ये बोटीसह काही किलोमीटर अंतर जाऊन पहाणी केली. मात्र त्यांना गांगर्डे हे आढळून आले नाहीत. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस उपनिरीक्षक दिवटे यास प्रमाणे नगर इथून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
अशोक गंगाधर गांगर्डे हे नेहमीप्रमाणे गावाला पाणी सोडण्यासाठी वस्तीवरून गावांमध्ये आले होते. परंतु पाणी सोडल्यानंतर परत जात असताना परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला. नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती. पाण्याच्या प्रवाहाला वेग होता,परंतु त्यांना याचा अंदाज आला नाही आणि नदीमध्ये वाहून गेले. ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या प्रथम लक्षात आली. त्यानंतर सर्वजण नदीवर एकत्र आले परंतु त्यांना कुठेही अशोक गांगर्डे दिसले नाहीत. त्यावेळी पासून अजूनही ते बेपत्ता आहेत. सीना नदीला पूर आलेला असून निमगाव गांगर्डा या गावातील पुलाच्या ठिकाणी आतापर्यंत चार गाड्या देखील वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुलावरून पाणी असताना पाण्यातून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान प्रशासनाने आता या पुलावरून जाण्याचा रस्ता बंद केला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक दिवटे यांनी दिली.
Web Title: Gram Panchayat staff went to the river and started search operation