Home अहमदनगर Suicide: राहता शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: राहता शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Rahata Suicide News:  राहता शहरातील १८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Youth commits suicide by hanging in Rahta

राहता: राहता शहरातील १८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहता येथील खंडोबा मंदिर परिसरात राहणार्‍या शिवराज भाऊसाहेब कुर्‍हाडे (वय 18) या तरुणाने अज्ञात कारणावरून त्याच्या स्वतःच्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण एका गॅरेजमध्ये कामास होता. आत्महत्येनंतर या तरुणाच्या मृतदेहाचे रविवारी दुपारी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर राहाता अमरधाम येथे रविवारी सायंकाळी या तरुणाचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आमदार दिलीप तुपे करीत असून राहाता पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Web Title: Youth commits suicide by hanging in Rahta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here