कार चालकाच्या डोक्यात हातोडा घातला, गाडीसह पैसेही घेऊन पळाले
Ahmednagar News: कार चालकाच्या डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील 02 आरोपी 5,06,250/-रुपये किंमतीचे (Money) मुद्देमालासह २४ तासाचे आत जेरबंद.
अहमदनगर: कार चालकाच्या डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील 02 आरोपी 5,06,250/-रुपये किंमतीचे मुद्देमालासह २४ तासाचे आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या डोक्यात हातोडा टाकला, जबर जखमी झाल्यानंतर त्या लोकांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम लांबवली. सचिन पठारे (रा. पिंपळगाव कौडा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.25 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी सचिन बापु पठारे (रा. पिंपळगांव कौडा,ता.जि. अहमदनगर) हे त्यांचे कडील हुंदाई कंपनीची ऑरा गाडी क्रमांक एम. एच.12 व्ही. व्ही. 7336 मधुन सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली असता फिर्यादी यांनी रात्रीचा वेळ असल्याने प्रवाशांना गाडीमधे बसवुन घेवुन जात असतांना रत्त्याने गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन फियादीस जखमी केले व त्यांचे कडील कार,मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण 5,04,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता.या घटनेबाबत सुपा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 547/2023 भादवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादीची भेट घेवुन फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा व गुन्ह्यातील चोरी गेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही कोपरगांव गांवचे दिशेने गेली असल्याचे दिसुन आले.पथक कोपरगांव परिसरामध्ये कारचा शोध घेत असतांना पोनि.श्री/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन कार व आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही रोडचे कडेला एका पेट्रोलपंपाजवळ उभी असल्याचे दिसुन आल्याने पथकाने सापळा रचुन कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शिवम मातादीन गौतम रा.बिनपुर, ता.पाटीयाली,जि.करजगंज, उत्तरप्रदेश हल्ली रा.मिंडा कंपनीजवळ सुपा ता.पारनेर, 2) दुर्जन अनारसिंग गौतम रा. नगलारगी,ता.पाटीयाली,जि. करजगंज,उत्तरप्रदेश हल्ली रा.मिंडा कंपनीजवळ सुपा ता. पारनेर असे असल्याचे सांगितले.मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये व कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण 5,06,250/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुपा पोलीस करीत आहे.
Web Title: Hammered the car driver’s head, ran away with the car along with the money
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App