Home अहमदनगर Heavy Rainfall : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Heavy Rainfall : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Heavy rainfall forecast in Maharashtra

अहमदनगर | Heavy Rainfall : राज्यात १८ मे ते २६ मे दरम्यान पाउस पडणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्या कारण मान्सूनपूर्व पावसाचे आगमन धो धो पावसाने होणार आहे. कोकणपट्टी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड परभणी, जालना औरंगाबाद नाशिक या जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाउस पडण्याचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील उर्वरित जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी सर्वसाधारण पाउस पडेल. अरबी समुद्रात चक्री वादळ घोंगावत आहे. तसेच १५ मे दरम्यान चक्री वादळात रुपांतर होऊन किनारपट्टीच्या भूभागापासून समुद्रात दीडशे किलोमीटर अंतराने समुद्रातून कराची कडे जाणार आहे. त्यामुळे राज्यात पाउस दिनांक १८ मे ते २६ मे दरम्यान पडणार आहे. वारे, विजा पासून स्वतः चे पशुचे, पाळीव प्राण्यांचे संरक्षण करावे. कोकण पट्टी, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ या विभागात तुरळक भागात धो धो पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील. दिलेल्या तारखेत एक दिवस मागे पुढे वाऱ्याच्या बदलानुसार पाउस होऊ शकतो असा अंदाज पंजाब डख या हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.  

Web Title: Heavy rainfall forecast in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here