Home अकोले Akole Lockdown: अकोले तालुक्यात १५ दिवस जनता कर्फ्यू

Akole Lockdown: अकोले तालुक्यात १५ दिवस जनता कर्फ्यू

Akole closed for 15 days 

अकोले | Akole Lockdown: अकोले तालुक्यात चार दिवसांपासून प्रचंड प्रमाणात रुग्ण संख्या आढळून येत आहे. शहरातील गर्दी पाहता सर्व व्यापारी व सर्वपक्षीय पदाधिकारी विचारविनिमय करून १५ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

अकोले तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता सर्व व्यापारी व सर्वपक्षीय पदाधिकारी विचारविनिमय करून दिनांक १५ मे ते ३० मे या कालावधीत कडक जनता  कर्फ्यूचे नियोजन केले आहे. यादरम्यान मेडिकल, दवाखने व दुध संकलन (दुध विक्री फक्त सकाळीच) चालू राहील. इतर सर्व अत्यावश्यक सेवा बंद राहील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे,

अकोले शहरात शनिवार दिनांक १५ मे २०२१ पासून कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून या दरम्यान किराणा दुकान, भाजीपाला व आस्थापना बंद राहतील. केवळ दुध विक्री आणि मेडिकल दवाखाने सुरु राहतील.

जीवनावश्यक काहीच नाही. जीवनच आवश्यक आहे. घरात रहा सुरक्षित रहा.

Web Title: Akole Lockdown closed for 15 days 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here