Home Minister Anil Deshmukh: राज्याचे गृहमंत्री करोना पॉझिटिव्ह
Home Minister Anil Deshmukh News: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वतः ट्वीट करून दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून असे म्हंटले आहे की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
दरम्यान देशामधील १० वर्षाच्या अधिक वयोगटातील २१ टक्क्याहून अधिक जणांना कोविड १९ ची लागण झाल्याचे आयसीएमआरच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. तसेच करोनाची सहज लागण होण्याचे प्रमाण देखील अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Web Title: Home Minister Anil Deshmukh Corona Positive