Home अकोले Akole: अकोले तालुक्यात महावितरण विरोधात टाळे ठोको आंदोलन

Akole: अकोले तालुक्यात महावितरण विरोधात टाळे ठोको आंदोलन

Lock up agitation against MSEDCL in Akole taluka

अकोले | Akole:  तालुका येथे शुक्रवारी दुपारी महावितरण विरोधात टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन माजी आमदार वैभव भाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

ग्राहकांना देण्यात वीज देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करा या मागण्यांसाठी भाजपाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे महामंत्री तथा माजी आमदार  वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील अकोले येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला माजी आमदार वैभवराव पिचड यांनी टाळे ठोकले.  यावेळी राज्यसरकार व वीजवितरण कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

.या आंदोलनात भाजपाचे जि.प.सदस्य व गटनेते जालिंदर वाकचौरे,भाजपा महिला आघाडीच्या जिल्ह्याध्यक्षा सोनाली नाईकवाडी,जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव,तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे,यशवंत राव आभाळे,मच्छिन्द्र मंडलिक,उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, परशुराम शेळके, प्रकाश नाईकवाडी, विजय सारडा,नामदेव पिचड, सुरेश लोखंडे,पं.स.सदस्या माधवी जगधने,तालुका महिला सचिव वैशाली जाधव, युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष राहूल देशमुख,हितेश कुंभार,अमोल येवले,संजीव पवार,शंभू नेहे, नाजीम शेख,अरुण शेळके,सुशांत वाकचौरे,भरत घाणे, सुनिल कोटकर,संदीप शेटे,शंकर धुमाळ, ज्ञानेश्वर पुंडे,केशव बोडके,विजय भांगरे,गोकुळ वाघ,यांचेसहित तालुक्यातील भाजपाचे नेते-कार्यकर्ते सहभागी होते.वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल,राजुरचे उपकार्यकारी अभियंता विवेक मवाडे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते वीज ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. महाविकास आघाडी आणि महावितरण विरोद्धात घोषणा करण्यात आल्या.

Web Title: Lock up agitation against MSEDCL in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here