HSC Result 2021: मोठी बातमी: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर
HSC Result 2021: महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल उद्या दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी चार वाजता जाहीर होणार असल्याचे परिपत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण खालील संकेत स्थळावरून उपलब्ध होतील. अधिकृत संकेत स्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे:
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
Web Title: HSC result 2021 will declared 3 august 2021