Home पुणे धक्कादायक! पत्नीला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून पती स्वतः पाहत होता

धक्कादायक! पत्नीला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून पती स्वतः पाहत होता

husband was watching himself, forcing his wife to have sex with friends

पुणे | Pune Crime: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला आपल्या मित्रांसोबत शारीरिक संबध (Sex) ठेवण्यास भाग पडले अन संबंध ठेवत असताना पती स्वतः त्या ठिकाणी उभा राहून पाहत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वारंवार मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसताना डिसेंबर २०२० मध्ये हडपसर येथील एका लॉजवर मित्रांबरोबर शारीरिक संबंध (Sex) ठेवण्यास भाग पाडले. तसेच २०२१ मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका लॉजवर आणखी एका मित्रासोबत शारीरिक संबध करण्यास भाग पाडले. हे सर्व घडत असताना पती स्वतः पाहत होता. या सर्व प्रकरणानंतर महिलेने तक्रार दाखल केल्याने पती व दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: husband was watching himself, forcing his wife to have sex with friends

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here